अफगाणिस्तानात पाकिस्तानी दूतावासाजवळ हल्ला

अफगाणिस्तानात पाकिस्तानी दूतावासाजवळ हल्ला

अफगाणिस्तानातील पाकिस्तानी दूतावासाजवळ अज्ञाताने आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये दोनजण ठार झाले तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला बुधवारी दुपारच्या सुमारास झाला.

पाकिस्तानी दूतावासाजवळ अज्ञात आत्मघातकी बाँबहल्लेखोराने स्वतःला उडवून देत स्फोट घडवून आणला. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवान आणि हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन पोलीस अधिकारी ठार झाले.

तालिबानशी पुन्हा शांतता चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच, पठाणकोट दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे.

गेल्या मंगळवारी भारतीय दुतावासाजवळ बॉम्बस्फोट झाला होता. मात्र, यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *