आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीला कंटाळलेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे.. केवळ तीन दिवसांत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार आहे. देण्याची प्रक्रियेला वेग देऊन ती पारदर्शक करतानाच आधारकार्डशी ते जोडण्यात येणार आहे.
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “वाहनचालक परवाना आधारकार्डशी जोडला जाणार आहे. वाहन चालकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांची चाचणी घेऊन फक्त तीन दिवसांत परवाना देण्यात येणार आहे.
एकही बनावट परवाना नाही
दरम्यान, बनावट परवान्यांबद्दल विचारले असता, “सध्या बनावट परवान्यांचा सुळसुळाट झाला असून एकाच व्यक्तीकडे 3 परवाने असतात” याची कबुलीही गडकरी यांनी दिली. परीक्षा दिल्याशिवाय एकही परवाना दिला जाणार नाही. येथून पुढच्या काळात एकाही बनावट परवाना तयार होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.