पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या एका बाँबस्फोटात 14 नागरिक मृत्युमुखी पडले, तर इतर 20 लोक जखमी झाले. क्वेट्टा शहरात स्फोट झाला. तोंडातून लस देणे हे धर्माच्या विरोधात आहे असे सांगत काही दहशतवादी गटांकडून येथील पोलिओ लसीकरण केंद्रांवर हल्ले करण्यात येत आहेत.
पाकिस्तानात मागील काही महिन्यांपासून पोलिओ केंद्रांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. लसीकरण केंद्र राबवत असलेल्या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी बाँबस्फोट झाला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबादारी घेतलेली नाही.
एका पोलिओ लसीकरण केंद्राबाहेर सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या गाडीजवळ हा स्फोट झाला. त्यामध्ये पोलिसांसह लसीकरण कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, पोलिसांच्या दोन वाहनांचे नुकसान झाले असून, स्फोटातील 20 जखमींना क्वेट्टा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आठजणांची प्रकृती गंभीरआहे.