बैलगाडी शर्यतीला स्थगिती

बैलगाडी शर्यतीला स्थगिती

तामिळनाडूत पोंगलनिमित्त आयोजित करण्यात येणा-या बैलगाड्यांच्या (जलीकट्ट) शर्यतीला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिली. केंद्र सरकारने या शर्यतीला मंजुरी दिली होती. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत स्थिगिती देण्यात आली.

मंगळवारी न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या पीठाने यावर सुनावणी केली. त्यानंतर बैलगाड्यांच्या (जलीकट्ट) शर्यतीला स्थगिती देण्यात आली.

गेली चार वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती. मात्र, मोदी सरकारने आठ जानेवारी रोजी ती उठवली. या निर्णयाला अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया, पेटा या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून तातडीने सुनावणीची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *