मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ शेखर नवरे यांचे निधन झाले. त्यांनी सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मंगळवारी ११.३० च्या सुमारास शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेखर हे सुप्रसिद्ध डॉक्टर असून त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपले नाव कमवले. राजा इडिपस या त्यांच्या पहिल्या नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरूवात केली. त्यांनी निमिर्ती क्षेत्रातही काम केले. दुरदर्शनवरील प्रसिद्ध ‘संस्कार’ मालिकेचे ते निमिर्ते होते.
शेखर यांनी ‘तु फक्त हो म्हण’, ‘एक होता शहाणा’, ‘वेटिंग फॉर गोदो’ अशा नाटकातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘खरा वारसदार’सारख्या काही चित्रपटातूनही प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या निधनामुळे मार्गदर्शक हरपल्याची हळहळ व्यक्त होत आहे.
Tags: shekhar navare | शेखर नवरे