सौंदर्य खुलवता खुलवता, कुरुप बनली

सौंदर्य खुलवता खुलवता, कुरुप बनली

आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मूळात सुंदर दिसणा-या व्यक्तीही आपल्या सौंदर्यावर समाधानी नसतात. त्यामुळे ते आपले सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नेहमीच विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. कधीकधी सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर सौंदर्य खुलवण्याऐवजी सौंदर्य बिघडवण्याला कारणीभूत ठरतो. असाच अनुभव २४ वर्षाच्या अॅमिलिया ग्रिविलिला आला.
मूळची इंग्लंडची असणारी अॅमिली सध्या बॅकॉकमध्ये रहात असून, तिथे ती शिक्षक म्हणून काम करते. अॅमिलीला आपले ओठ अधिक सुंदर, आकर्षक दिसावे अशी इच्छा होती. म्हणून तिने एका थाय दवाखान्यात ज्युवेडर्म लीप फिलरचे इंजेक्शन घेतले. यूकेमध्ये ज्युवेडर्म लीप फिलर इंजेक्शनची किंमत ४०० पाऊंड आहे. पण इथे फक्त ५० पाऊंडमध्ये लीप फिलर इंजेक्शन स्वस्तात मिळाल्यामुळे अॅमिली आनंदात होती.
मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात इंजेक्शन घेतल्यानंतर तिचे ओठ भरले अधिक आकर्षक दिसू लागल्याने ती आनंदात होती. पण हा आनंद अल्पकाळ टिकला. काही महिन्यातच तिच्या ओठामध्ये गुठळया तयार झाल्या. ओठ काळे-निळे पडले. ज्या ओठांमुळे तिला सौंदर्य मिळाले त्याच ओठांमुळे तिच्या सौदर्याला डाग लागला.
ज्युवेडर्म लीप फिलरचे इंजेक्शन त्वचेमधल्या पदार्थापासून बनवले जाते. यामुळे ओठ भरुन येतात. सहा ते वर्षभर या इंजेक्शनचा प्रभाव रहातो. नंतर ओठ पुन्हा पूर्वीसारखे होतात. अॅमिली आता ओठ पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *