हिंगोली शहरात एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा एटीएम फोडीची घटना समोर आली आहे.
पोलिस स्थानक आणि बसस्थानकापासुन हाकेच्या अंतरावर भल्या पहाटे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. या एटीएममधून २० लाख ३६ हजार रुपये पळवून चोरटे पसार झाले आहेत.
मागच्या महिन्यातच परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच एटीएम फोडण्यात आलं होतं. तर सहा महिन्यांपुर्वी इंडिया बँकेच्या एटीएममधून पैसे भरणा-या लोकांनीच एटीएममधील रक्कम कोडच्या माध्यमातून बनाव करून पळवली होती.
एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेर फोडून गैस कटरने एटीएम फोडण्यात आल आहे.या एटीएमवर सुरक्षारक्षक सुद्धा नसल्याच पोलिस तपासात समोर येत आहे.शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून हिंगोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.