‘अतुल्य भारत’मध्ये अमीरऐवजी ‘बिग बी’

‘अतुल्य भारत’मध्ये अमीरऐवजी ‘बिग बी’

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीचा जगभरातच प्रसार करणार असून पर्यटकांना ‘अतुल्य भारत’चे दर्शन घडवणार आहेत. अमिताभ बच्चन यांचे केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘अतुल्य भारत’ अभियानाचे नवे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते.

गेल्या दहा वर्षापासून अभिनेता आमीर खान अतुल्य भारत अभियानाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होता. मात्र, आता तो नसेल, असे पर्यटन विभागाने बुधवारी जाहीर केले होते. त्यामुळे आता आमिरनंतर अतुल्य भारत अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर म्हणून अभिनेता अमिताभ बच्चन दिसण्याची शक्यता आहे.

अमिरने दोन महिन्यांपुर्वी असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्याला हे प्रकरण भोवले असावे, अशी चर्चा होत आहे.

केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने अमिरसोबतचा करार संपल्याचा दावा करत त्याची गंच्छती करण्यात आली. तर गुरूवारी लगेचच अमिताभ बच्चन यांचे नावाची चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *