लिबिया शहरातील झ्लिटेनमध्ये असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर ट्रकबॉम्बचा हल्ला करण्यात आला असून यामध्ये ५० जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हा हल्ला गुरूवारी झाला.
लिबिया शहरातील झ्लिटेनमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रावर पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी अनेक सदस्य आले होते. त्यावेळी अचानक हा ट्रक हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यामध्ये ५० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्यकाहीजण गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना मिसराता शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.