मान्यवरांनी दिल्या प्रणवला शुभेच्छा

मान्यवरांनी दिल्या प्रणवला शुभेच्छा

कल्याणमध्ये राहणा-या १६ वर्षीय प्रणव धनावडेने जबराट खेळी करतांना नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केल्यानंतर माजी किकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह क्रिडा, राजकारण आणि देशातील अन्य मंडळींनीदेखील प्रणवचे अभिनंदन केले.

कल्याणमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या च. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा साखळी सामना कल्याणमधील वायलेनगर मैदानावर सुरू होता. यावेळी प्रणवने ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावा ठोकल्या.

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत १००० धावा करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. प्रणवला सचिनने ट्विटर आणि फेसबूकवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर शरद पवारांनी देखील त्याचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *