‘नटस्रमाट’ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

‘नटस्रमाट’ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

कुणी घर देता का घर…, असं म्हणत चित्रपटगृहात दाखल झालेल्या ‘नटसम्राट; चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘नटसम्राट’ने बॉक्स ऑफिसवर केवळ तीन दिवसात तब्बल दहा कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘नटसम्राट’ 1 जानेवारी रोजी 450 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. सुट्टीचा पुरेपूर उपयोग करुन या सिनेमाने अवघ्या तीन दिवसात दहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेली ‘नटसम्राट’ ही रंगभूमीवरील अजरामर कलाकृती रुपेरी पडद्यावर मांडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पेललं. नाना पाटेकर यांनी यात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. नानांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तर पाणावलेल्या डोळ्यांनी प्रतिसाद दिला. त्याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला.

दरम्यान, ‘नटसम्राटची 30 टक्के रक्कम ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याची घोषणा नाना पाटेकर यांनी सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *