नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचं कारण त्यांनी पुढे केलं असलं, तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे.
राजीनामा देताना सादर केलेल्या पत्रात त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांना मिळालेल्या पोस्टिंगवरुन ते नाराज असल्याची माहिती आहे. के. एल. प्रसाद यांनी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा खांद्यावर घेतली होती. मात्र त्यांना ठाणे किंवा पुण्याच्या पोलिस आयुक्तपदात स्वारस्य असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.