पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. येत्या काही दिवसात मोदी इस्त्राईलला जाणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.
या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. विशेष म्हणजे इस्त्राईलचा दौरा करणारे मोदी दक्षिण आशियातील देशांचेही पहिले प्रमुख ठरणार आहेत.
इस्त्राईलच्या स्थापनेला भारतानं पाठिंबा दिल्यापासूनच दोन्ही देशांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.