श्रद्धाने काढली धवलची विकेट, मराठमोळ्या धवल कुलकर्णीचा साखरपुडा

श्रद्धाने काढली धवलची विकेट, मराठमोळ्या धवल कुलकर्णीचा साखरपुडा

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. क्रिकेटच्या मैदानातून फुरसत मिळाल्यानंतर मुंबईचा मराठमोळा धवल कुलकर्णीनेही त्याचा साखरपुडा उरकला.

मुंबई रणजी संघाचा सदस्य आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा धवल कुलकर्णीने त्याची मैत्रीण श्रद्धा खारपुडेसोबत साखरपुडा केला. धवलने सोशल मीडियावर त्याचा आणि होणाऱ्या बायकोचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

धवलसह राजस्थान रॉयल्समधील त्याचा सहकारी अजिंक्य रहाणेनेही दोघांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

सारखपुड्याचा फोटो ट्विटरवर शेअर करताना धवलने लिहिलं की, “जी व्यक्ती आपल्या आयुष्यात जास्त महत्त्वाची आहे, ती आयुष्यभर तुमच्यासोबत असेल, यापेक्षा मोठं काहीही नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *