जलालाबादमध्ये भारतीय दुतावासजवळ स्फोट

अफगानिस्तानमधील जलालाबाद येथे असलेल्या भारतीय दुतावासजवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाला.  यामध्ये एक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोट संदर्भात आणखी कोणतेही वृत्त अद्यापही समजलेले नाही.

अफगानिस्तानमध्ये जलालाबाद शहरात भारतीय दुतावासापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला. मात्र, हा स्फोट भारतीय दुतावासाला लक्ष्य करून केला नसल्याचे वृत्त सुत्रांकडून समजते. भारतीय दुतावासजवळच पाकिस्तानी दुतावास असल्याचे सांगण्यात आले आहे.

ज्या परिसरात हा स्फोट झाला तेथून पाकिस्तानी दितावास जवळ आहे तर भारतीय दुतावास ४०० किमी अंतरावर असल्याचे सुत्रांकडून समजते.

दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ येथे भारतीय दूतावासावर रविवारी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये २५ तास गोळीबार सुरू होता. सोमवारी रात्री हे गोळीबाराचे सत्र संपले. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *