अॅप सांगणार बाळ का रडतयं…

काय झाले, तुमचे बाळ रडत आहे का? का रडतेय बाळ याचे कारण समजत नाही आहे का? पण आता घाबरायचे कारण नाही…

घरात जर अनुभवी आजी नसेल तरी तुम्हाला बाळ का रडतये याच कारण मोबाईल द्वारे कळणार आहे. तैवानच्या ‘नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी हॉस्पिटल युनलिम’ने यासाठी एक खास अॅप तयार केला आहे. जे लहान मुलांचा आवाज ऐकून त्यामागचे कारण सांगू शकेल. ‘इन्फंट क्राइज ट्रान्स्लेटर’ असे या अॅपचे नाव आहे.

एका संशोधकाने हे अॅप लहान मुलांच्या रडणे ट्रान्सलेट करुन वेगवेगळ्या आवाजावरुन ही कारणे सापडतात. हे अॅप विकसीत करण्यासाठी संशोधकांनी १०० नवजात बालकांच्या रडण्याचे  दोन लाख रेकॉर्डिंग्स जमा केल्या.

जेव्हा मुल रडेल त्यावेळी स्मार्टफोनच्या रेकाॅडिंगचे बटन सुरु करुन  दहा  सेकंदांपर्यंत आवाज रेकाॅर्ड करायचा त्यानंतर हा आवाज आपोआप अॅपमधील क्लाऊड ड्राईव्हमध्ये अपलोड होईल. त्यानंतर पुढच्या पंधरा सेकंदातच बाळ का रडत होत याच उत्तर युजरला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *