आयआरबीला दहा हजार कोटींचे कंत्राट

आयआरबीला दहा हजार कोटींचे कंत्राट

रस्तेबांधणीत देशातील अग्रेसर कंपनी म्हणून ओळख असलेल्या आयआरबी कंपनीला जम्मू-काश्मीर झोझिला पास टनल, या दक्षिणपूर्व-आशियातील सर्वांत मोठा बोगदा बांधण्याचे कंत्राट प्राप्त झाले आहे.

या नव्या बोगद्याचे व अनुषंगिक रस्त्याचे महत्त्व म्हणजे यामुळे जम्मू-काश्मीर व लेह-लडाख यादरम्यान अत्यावश्यक असलेला संपर्क सर्व ऋतूंमध्ये साधणे शक्य होणार आहे. प्रकल्प शुल्काच्या अनुषंगाने हा देशातील सर्वांत मोठा राष्ट्रीय महामार्ग असून, या बोगद्याची लांबी १४.०८ किलोमीटर इतकी आहे. याच्या बांधकामाकरिता १०,०५० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

याचसोबत, १०.८ किलोमीटरच्या जोडरस्त्याचे बांधकाम आणि ७०० मीटरची स्नो-गॅलरीदेखील विकसित करण्यात येणार आहे.

कंपनीचे कुशल मनुष्यबळ हिमालयीन प्रदेशातील आव्हानांना तोंड देत नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करेल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *