मुंबईतल्या रस्त्यांवर यापुढे पेव्हर ब्लॉक्स वापरले जाणार नाहीत. नव्या पद्धतीने रस्ते बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि उखडले जाणारे पेव्हर ब्लॉक यांवर उपाय म्हणून नव्या पद्धतीनं रस्ते बांधण्याचं मुंबई महापालिकेने ठरवलं आहे. रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचा वापर संपूर्णपणे थांबवण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबईच्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात येईल. रस्त्यांची बांधणी अस्फाल्ट, सीसी वापरुन करण्यात येईल. त्यामुळे खड्ड्यांना वैतागलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.