जलद आणि किमान परवानगी प्रक्रियेमुळे ग्राहकांना सुमारे १० ते १५ टक्के स्वस्त दरामध्ये घरं उपलब्ध होऊ शकतील असा अंदाज, महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या ठाणे युनिटनं व्यक्त केलाय.
इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे इमारत उभारणीसाठी परवानग्यांची प्रक्रिया साठ दिवसात पुर्ण होऊ शकते.
ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सध्या इमारत बांधकामासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू होतं.
बांधकाम परवानगी मंजूर प्रक्रियेला उशीर झाल्याने प्रकल्पांचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडतो. मुख्यमंत्र्यांनी ६१ परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे परवानग्यांची संख्या ११९ वरून ५८ वर आली आहे.