असं म्हणतात देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो. असंच काहीस पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झालंय जो एका रात्रीत अब्जाधीश बनला. ही गोष्ट त्यालाही माहीत नव्हती. आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. या नोटिशीत या शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कोठून आली याचे स्पष्टीकरण मागितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घाशीराम शिवलाल असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पासबुकमधील एंट्रीमध्ये ६९२ दशअब्ज ९१ अब्ज ६ कोटी ९४ लाख ४१ हजार ६२९ इतकी रक्कम दिस होती. ही एंट्री तीन आणि ८ तारखेला करण्यात आलीये.
दरम्यान, ही काही मोठी बाब नसल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. टेक्निकल एररमुळे हे घडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयकर विभागाने याबाबत माहिती मागितल्यास बँक देईल असेही त्यांनी सांगितले.