एक रुपयाच्या नोटची किंमत ही १ रुपय पेक्षाही अधिक असते अशी माहिती आरटीआय अंतर्गत समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी मागितलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नोट बनवण्यासाठी १.१४ रुपये खर्च होतात.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने ही एक रुपयाची नोट न छापण्याचा केंद्र सरकारला सल्ला दिला होता. एक रुपयची नोट बनवण्यासाठी जास्त खर्च लागतो आणि ती अधिक ठिकाऊही नसते.