पतीने पत्नी, मुलगा, भाचीला पेटवलं, मुलीचा मृत्यू

मिरा रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाटकेश येथील हब टाऊन गार्डेनिया, फेस वन, या सोसायटीमध्ये बहादूर सिंह पत्नी तानिया, एक वर्षांचा मुलगा जयदेव आणि मेव्हणीची 20 वर्षीय मुलगी शुकीलासह भाड्याने राहात होता. दोन वर्षापूर्वीच या तानिया आणि बहादूरचं लग्न झालं होतं. तानिया ही बोरीवलीतील एका बारमध्ये काम करायची. बहादूर येथे जात-येत असल्याने या दोघांचे तेथे सूत जुळले. महत्त्वाचं म्हणजे बहादूरचं पहिलं लग्न झालं होतं. तानिया आणि बहादूर यांचं मागील तीन-चार महिन्यापासून भांडण सुरु होतं होते. बहादूर तिला सोडून देण्याची धमकी देत होता.

नववर्षाच्या पहाटेला त्यांनी सर्वांना जाळण्याचा प्रयत्न केला. पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी घरातील सर्व साखरझोपेत असताना बहादूरने सगळ्यांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात शकीलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पत्नी तानिया ही 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. तर त्यांचा तान्हुला जयदेवला थोडी दुखापत झाली आहे. दोघांना कांदिवलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *