नववर्षानिमित्त सिद्धिविनायक, शिर्डीत भक्तांची गर्दी

नववर्षानिमित्त सिद्धिविनायक, शिर्डीत भक्तांची गर्दी

आज नव्या वर्षातील पहिला दिवस. नव्या वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी. यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक तसेच शिर्डीत भक्तांनी मोठी गर्दी केलीय. नवीन वर्ष सुरु करताना देवाचे आशीर्वाद घ्यावेत याच धारणेने मोठ्या संख्येने या मंदिरात भाविकांची गर्दी आहे.

आपल्यावर येणारी सर्व विघ्न दूर व्हावीत यासाठी गणेशभक्तांनी मध्यरात्रीपासूनच सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी केली. तर दुसरीकडे शिर्डीनगरीही साई भक्तांनी फुलून गेली. नववर्षानिमित्त शिर्डीतलं साईमंदीर दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्यात आलं होतं.

वाराणसीत नव्या वर्षाची सुरुवात झाली ती गंगा आरतीनं. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं गंगापूजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *