मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर २०१५ च्या मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे २०१६चे रात्री जल्लोषात स्वागत केले.
तांबड्या आसमंतात समुद्राच्या लाटांवरती स्वार होत २०१५ला गुडबाय करत सूर्य अस्ताला गेला. तर दुसरीकडं गोव्यातही समुद्राच्या बीचेसवर २०१५ला निरोप देण्यासाठी आणि थर्टी फर्स्टचा जल्लोष करण्यासाठी अलोट गर्दी जमलीय. गोव्यातही २०१५च्या सूर्यास्ताचं मनमोहक दृश्याचा लाभ गोव्यात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी घेतला.