पतंजलीच्या तुपात बुरशी

पतंजलीच्या तुपात बुरशी

योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’च्या तुपामध्ये बुरशी आढळल्याने त्याची चाचणी करण्यात येणार आहे. मात्र रामदेव बाबा यांचे सहकारी बाळकृष्ण यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

हरिद्वार येथील काही नागरिकांनी पतंजलीचे गाईचे तूप घेतले होते. त्या डब्यांमध्ये बुरशी आढळली. अन्न सुरक्षा अधिका-याने तुपाचे काही नमुने चाचणीसाठी घेतले असून ते रुद्रपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल १५ दिवसांत येणार आहे. जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी महिमानंद जोशी यांनी तुपाचे नमुने चाचणीसाठी घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र गुणवत्ता सुनिश्चितीसाठी हे नमुने घेतल्याचे हिमाचल प्रदेशचे आरोग्यमंत्री सुरेंद्र सिंग यांनी सांगितले.

दरम्यान, रामदेव बाबांचे सहकारी बाळकृष्ण यांनी हा आरोप फेटाळला आहे. आम्ही जे तूप तयार करतो ते उच्च तापमानावर तापवले जाते. त्यानंतर ते त्वरित बंद डब्यात भरले जाते. त्यामुळे या तुपाला बुरशी लागणे शक्यच नसल्याचे बाळकृष्ण यांनी सांगितले. पतंजलीची प्रतिमा बाजारात खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बाळकृष्ण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *