काश्मीरात पाकचे झेंडे फडकावणारच- गिलानी

पाकिस्तान हा आमचा शेजारी देश असून, तो आमचा शुभचिंतक आहे. त्यामुळे यापुढेही काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावतच राहणार असल्याचे, हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता सईद अली शहा गिलानी याने म्हटले आहे.
 
काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडविण्याच्या घटना सतत घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. तरीही रविवारी झालेल्या हुर्रियतच्या रॅलीमध्ये गिलानी यांनी यापुढेही पाकिस्तानचे झेंडे आम्ही फडकवत राहणार असल्याचे म्हटले आहे.
 
काश्मीरमध्ये ज्यावेळी हुर्रियत कॉन्फरन्सच्या रॅली होतात, तेव्हा पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातो. गिलानी म्हणाले, पाकिस्तान हा आमचा उपकारकर्ता आहे. काश्मीरला स्वनिर्णयाचे स्वातंत्र्य देण्याच्या कल्पनेला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. येथील नागरिकांचे पाकिस्तानवर प्रेम आहे. काश्मीरमध्ये 1947 पासून पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत आणि यापुढेही फडकत राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *