मुस्लिम म्हणून नोकरी नाकारणाऱ्या तरुणाला अदानी समुहात नोकरी

मुस्लिम म्हणून नोकरी नाकारणाऱ्या तरुणाला अदानी समुहात नोकरी

एमबीए केलेल्या तरुणाला केवळ तो मुस्लिम असल्यानं मुंबईतील हिरेकंपनीनं नोकरी नाकारली होती. त्याच तरुणाला झीशान अली खानला अदानी समुहात मुस्लिम म्हणून नोकरी नाकारणाऱ्या तरुणाला अदानी समुहात नोकरी . अदानीच्या मुंबई कार्यालयात तो एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी म्हणून जॉईन होईल.

झीशाननं मुंबईतील हिरे कंपनीत मार्केटिंग विभागात नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र कंपनीनं मुस्लिम असल्यानं झीशानला नोकरी नाकारली होती. तेव्हापासून झीशान चर्चेत आला असून हा प्रकार मीडियामध्ये झळकताच झीशानला अनेक कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिली होती. यात झीशानने अहमदाबादच्या अदानी समुहातील नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

अदानी समुह इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील मोठा समुह असल्यानं ही नोकरी स्वीकारल्याचं झीशानने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *