नवरा- बायकोच्या सततच्या वादाला कंटाळून संतापाच्या भरात निर्दयी मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. यात दोन महिन्यांच्या मैत्री विजय पाटेकर या मुलीचा मृत्यू झाला.
निगडी ओटास्कीम येथे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी आई सुषमा विजय पाटेकर हिला ताब्यात घेतल्याचे असून सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी ओटास्किम भागातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन दोन महिन्यांची चिमुरडी सकाळी साडेसहाच्या सुमारास खाली पडल्याचे तिच्या आईने सांगितले. यात ती गंभीर जखमी झाली होती. तिला त्वरित पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उफचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी निगडी पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मुलीची आई व वडिल वेगळे राहतात. त्यांच्यात वाद चालू आहेत. त्यामुळे आईनेच मुलीला खाली फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.