लोकल बंद पडली, मरे कोलमडली

लोकल बंद पडली, मरे कोलमडली

अंबरनाथ स्थानकाजवळ लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वे खोळबंली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सीएसटीकडे येणारी वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

सीएसटीच्या दिशेने निघालेली लोकल सकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ अचानक बंद पडली. ही लोकल हटवण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. अंबरनाथ ते उल्हासनगर हे अंतर पार करण्यासाठी अर्धातास लागत असल्याचे प्रवाशांकडून कळते.

सकाळी लोकल बंदी पडली असली तरी दुपारपर्यंत ही लोकल हटवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सीएसटीकडे जाणा-या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहेत.

या घटनेबाबत कोणतिही घोषणा रेल्वे स्थानकावर होत नसल्याने प्रवाशांचा मात्र गोंधळ उडाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *