मुंबईत ईस्टर्न फ्री वेजवळ 6 वर्षीय मुलाचा सांगाडा सापडला

मुंबईत ईस्टर्न फ्री वेजवळ 6 वर्षीय मुलाचा सांगाडा सापडला

मुंबईतील ईस्टर्न फ्री वेजवळील एका पोकळीत ६ वर्षीय मुलाचा सांगाडा सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फ्री वेजवळ केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना हा सांगाडा आढळून आला. मृत मुलगा वडाळ्यातून 13 ऑक्टोबर 2015 पासून बेपत्ता होता.

या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह येथील एका पोकळीत दडवून ठेवण्यात आला होता. फुरकन रहीम खान (वय 6) असे या मुलाचे नाव आहे. तो वडाळा येथील दिनबंधू नगर मध्ये राहणारा होता.

वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून पुढील तपास सुरू आहे. फ्री वे ची ही पोकळी पूलाच्या खालील बाजूस असून ती सीएसटीपर्यंत आहे. ही एक विचित्र घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *