चीनमध्ये १७ हजार कारखाने आजपासून बंद

वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी चीनमध्ये शनिवारी १७ हजार कारखाने बंद कऱण्यात आलेत. तसेच २८ हजार ६०० कारखाने तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आलेत. या कंपन्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करत असल्याने मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.

हॉटलाईनद्वारे मिळालेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला. चीन सरकारने सप्टेंबरमध्ये हॉटलाईन सुरु केली होती आणि याद्वारे नागरिकांना प्रदूषणबाबतच्या तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत १२ हजार ३६९ तक्रारींचे फोन आलेत. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या तक्रारींद्वारे ६३ हजार ७०० कंपन्या बेकायदा पद्धतीने कंपनी चालवत असल्याची माहिती मिळाली.

सर्वाधिक तक्रारी या केमिकल, मेटल प्रोसेसिंग आणि मिनरल मेटल प्रोसेसिंग कंपन्याविरोधात आल्या होत्या. तक्रारी मिळाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मंत्रालयाने ५०४ पथके बीजिंगसह देशभरात अधिक तपासासाठी पाठवली. या तपासादरम्यान या कंपन्या पर्यावरण नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आलेय.

बीजिंगमध्ये ख्रिसमस दिवस ठरला सर्वात प्रदूषित दिवस

राजधानी बीजिंगमध्ये शुक्रवारचा दिवस सर्वाधित प्रदूषित दिवस ठरला. शुक्रवारी प्रदूषणाच्या पातळीने मोठा उच्चांक गाठला. ख्रिसमसच्या दिवशी बीजिंगमध्ये पीएम स्तर ५०० पार पोहोचला होता. यापूर्वीच येथे प्रदूषणामुळे हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *