ठाण्यात क्रिकेटच्या वादातून एकाची हत्या, दोघांना अटक

भारतीयांचं क्रिकेटवेड वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र क्रिकेट खेळताना मित्राशी झालेल्या वादात एका मुलाला आपले वडील गमवावे लागले आहेत. ठाण्यातील शिळ-डायघर परिसरात ही घटना घडली आहे.

तेथील एकता नगर परिसरात राहणारा बारा वर्षांचा रेहमान खान आणि त्याचा मित्र रेहमत अली हे क्रिकेट खेळत होते. खेळता खेळता त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी रेहमान खानचे वडील मकबूल खान हे रेहमान अलीच्या घरी गेले. मात्र समजूतीनं भांडण सोडवण्याएवजी प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं.

रेहमान अलीच्या घरात उपस्थित असलेल्या मोहब्बत आणि रिजवान अली यांनी मकबूल खान यांनी गंभीर मारहाण केली. त्यात मकबूल खान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता मोहब्बत आणि रिजवान यांना अटक करण्यात आली असून त्यांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *