स्टंटबाजी करण्याच्या प्रयत्नात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांला जीव गमवावा लागला आहे. हैदराबादमधील एका खासगी महाविद्यालयात ही धक्कादायक घटना घडली.
साई क्रिष्णा असं या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला शिकत होता.
काल रात्री हा विद्यार्थी अभियांत्रिकीच्या होस्टेलच्या तीसऱ्या मजल्यावर असलेला एका गॅलरीतून दूसऱ्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होता.मात्र त्यात त्याचा तोल गेला अन् तो सरळ खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या घटनेचा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
