कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

कुख्यात गुंड सलीम महंमद शेख उर्फ सल्या चेप्या याचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरू होते.

ऑक्‍टोबरमध्ये सल्या चेप्या सह सात जणांवर मोक्कातंर्गत कारवाई झाली होती. त्यामध्ये त्याला अटक करण्यात आले होते.

कराड येथे न्यायालयाच्या आवारात त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये  सल्या चेप्याला गोळी लागली होती.गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आले होते. मात्र त्याच्या तब्बेतील काही सुधारणा झाली नव्हती.

त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार व्हावे अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, त्याच्या अर्ज फेटाळण्यात आला. त्याच्यावर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधावारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सल्या चेप्या हा सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हल्ले असे  बावीस गुन्हे दाखल करण्यात आले होते.  त्याच्यावर मोक्काची कारवाई झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *