छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त

छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात अंमलबजावाणी संचालनालयानं मोठी कारवाई केलीय.

भुजबळाच्या कंपनीच्या मालकीच्या मुंबईतल्या दोन मालमत्ता ईडीनं जप्त केल्यात. या मालमत्तांची किंमीत सुमारे 100 कोटींच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

परवेश कंस्ट्रकशन नावाच्या कंपनीत भुजबळ आणि त्याचे कुटुंबीय संचालक आहेत. याच कंपनीच्या बांद्रा आणि सांतक्रुझमधल्या इमारतींवर कारवाई करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *