कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात साईबाबांचे दर्शन घेऊन घरी परतणा-या कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.

या अपघातात जाधव कुटुंबातील मोतीलाल शिवलाल जाधव (३४), दिपाली मोतीलाल जाधव (३०), अदित्य मोतीलाल जाधव (११), यशराज मोतीलाल जाधव (७) यांचा मृत्यू झाला.

पुण्यातील वाघोली येथील जाधव कुंटुंब साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असतांना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात त्यांची कार पोहचली असता अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे कार रस्त्यावर असलेल्या कुकडी कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *