व्हॉट्सअॅपच्या मदतीने रोखला स्वतःचा बालविवाह

सोशल नेटवर्किंगमध्ये प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअॅपमुळे हैदराबादमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतःचा बालविवाह रोखल्याची घटना घडली आहे.
 
हैदराबादमधील सुरूरनगर भागात बी. गीता या 15 वर्षीय मुलीचा विवाह होणार होता. मार्चमध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गीताची पुढे शिकण्याची इच्छा होती. पण, तिचे वडील बाबुगोंडा बी. विठ्ठल यांनी तिच्या शिक्षणास नकार दिला आणि तिला विवाह करण्यास सांगितले. तिने विवाह न केल्यास आपण आत्महत्या करू, अशी धमकी तिच्या वडीलांनी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव तिला घराबाहेरही पडता येत नव्हते. अखेर तिने व्हाट्सअॅपवरून पोलिसांनी याची माहिती दिली. 
 
पोलिस उपअधीक्षक पी. वेणुगोपाळ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास आम्हाला तिने आपल्या बालविवाहाबाबत स्वतः लिहिलेल्या पत्राचा फोटो काढून आम्हाला पाठविला. त्यानंतर आम्ही सरूरनगर भागातील पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी लग्नादिवशी लग्नठिकाणी जाऊन हा विवाह रोखला. पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना समज देत तिला पुढे शिक्षण घेऊ देण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *