विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी लाच देताना रंगेहाथ अटक झालेले तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार रेवानाथ रेड्डी यांना आज (सोमवार) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
तेंलगण विधान परिषदेसाठी आज मतदान होत असून, अँगो-इंडियन आमदार एल्वीस स्टीफनसन यांना 50 लाख रुपयांची लाच देत असताना रेड्डी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली होती. रेड्डी यांना रविवारी रात्री सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या घरातून 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीत टीडीपीच्या बाजूने मतदान करण्यासाठी रेड्डींकडून ही लाच देण्यात येत होती.
रेड्डी यांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. न्यायालयाने आज त्यांना निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली आहे.