नर्गिस दत्त यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून वाहिली आदरांजली

नर्गिस दत्त यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून वाहिली आदरांजली

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

‘मदर इंडिया‘, ‘आवारा‘ अशा अनेक चित्रपटांमधून नर्गिस दत्त यांनी केलेला अभिनय अफलातून गाजला होता. बॉलिवूडची पहिली ‘क्वीन’ आणि ‘मदर इंडिया’ म्हणून त्यांना ओळखले जाते.
नर्गिस यांचा सुनील दत्त यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना संजय दत्त, प्रिया आणि नम्रता दत्त ही तीन मुले आहेत. नर्गिस यांचे तीन मे १९८१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.

सरकारतर्फे मानाचा पद्यश्री पुरस्कार मिळालेल्या नर्गिस दत्त या पहिल्या अभिनेत्री आहेत. त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कारही मिळाला. दरवर्षी होणा-या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतेवर बनलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमाला ‘द नर्गिस दत्त अवॉर्ड‘ दिला जातो.

तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाने केले तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरूवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून ते १९६०च्या दशकापर्यंत २० वर्षांच्या कारकिर्दीत नर्गिसने अनेक सिनेमांतून काम केले.

दत्तच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी नर्गिस दत्तने लग्न केले. त्यानंतर तिने रात और दिन चित्रपटात अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *