मुंबईपासून २०० सागरी मैल अंतरावर ओएनजीसीच्या जहाजाला रविवारी रात्री आग लागली. या जहाजाच्या इंजिन रूमला आग लागली आहे.
या जहाजातून २४ कर्मचा-यांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तर अजूनही ९ कर्मचारी या जहाजात अडकले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
आगीचे कारण अस्पष्ट असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहे.