धार्मिक कार्यक्रमात पैशांचा पाऊस

धार्मिक कार्यक्रमात पैशांचा पाऊस

गुजरातमध्ये आयोजित केलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात पैशांचा अक्षरक्षः पाऊस पडल्याचे चित्र पहायला मिळाले.

गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील कालवाड तालुक्यात कहंबलिया या गावात मंदिराच्या जिर्णोध्दारप्रसंगी लोकगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गायकावर सुमारे साडेचार कोटी रुपयांचा पाऊस पाडला. या पैशातून गावाचा विकास करण्यात येणार आहे.

मुळचे भारतीय परंतू दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या पटेल कुटुंबियांनी किर्तीदान गढवी आणि माया आहिरच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नोटांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला.

सौराष्ट्रमध्ये अशाप्रकारचे लोकसंगीत कार्यक्रम नेहमी होत असतात. पैशांचा पाऊसही पडतो. परंतू इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा जमा होण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे गावकरी सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *