भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी २०१५ हे वर्ष लगीनघाईचे वर्ष ठरले आहे. हरभजन सिंगचे नुकतेच लग्न झाले असून आता रोहित शर्माही आपली मैत्रिण रितिका सजदेसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
वन डे कसोटी मालिकेमध्ये पराक्रम गाजवणारा रोहित शर्मा आणि रितिका सजदेचा विवाहसोहळा मुंबईतील ताज लँड्स इनमध्ये रविवारी आयोजित करण्यात आला आहे. रात्री आठ वाजता रिसेप्शन पार्टी होणार असल्याचे समजते.
रितिका आणि रोहितची तब्बल आठ वर्षापासूनची मैत्री आहे. रोहितने त्याच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी रितिकाला प्रपोज केला. अखेर ते दोघे रविवारी, १३ डिसेंबरला लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत.
याचवर्षी भारतीय क्रिकेट संघामधील अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि हरभजनसिंग लग्नबंधनात अडकले.