पाकिस्तानमधील पाराचिनार शहरात असलेल्या कपड्याच्या बाजारामध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५०जण गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ असलेल्या पाराचिनार शहरात इदगाह बाजार असतो. येथे मोठ्या प्रमाणात कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. रविवारी दुपारच्या सुमारास खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली असतांना हा बॉम्बस्फोट झाला.
या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला तर ५५ जण जखमी आहेत. त्यापैंकी १५ जण गंभीर जखमी असल्याचे आधिका-याने सांगितले.
सुरक्षा दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर बंद ठेवला आहे. या हल्ल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत अद्यापही कोणतिही माहिती मिळालेली नाही.