ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रविवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
वांद्रे येथील पाली हिलवरील दिलीपकुमार यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव आदी नेते उपस्थित होते.
रविवारी दुपारी दोन वाजता त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी मोजक्याच मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. दिलीपकुमार यांनी शुक्रवारी ९३वा वाढदिवस साजरा केला होता.