संसदेवर 13 डिसेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आदरांजली वाहिली.
आज सकाळी संसदेच्या प्रांगणात या जवानांना मोदींसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आदरांजली वाहिली.
संसदेच्या आवारात 13 डिसेंबर 2001 ला पाच शस्त्रास्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सहा जवानांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर पाच दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले होते.