गडचिरोलीजवळ अपघातात 5 जणांचा मृत्यू

गडचिरोली-नागपूर महामार्गावर देऊळगावजवळ आज (रविवार) सकाळी मोटार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज धरणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज धरणे आपल्या कुटुंबीयांसह मोटारीतून आज सकाळी गडचिरोलीला येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारीला धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यात धरणे यांच्यासह पत्नी, दोन मुले व आई असे कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाला. धरणे हे गडचिरोलीत फिंगरप्रिंग विभागात कार्यरत होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *