राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना रविवारी हृद्यविकाराचा झटका आला असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
रविवारी दुपारी कात्रज येथे दूध संघामध्ये शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते, त्यावेळी त्यांना अचानक हृद्यविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ जवळच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वळसे-पाटील यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील जाहांगिर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबर पक्षाचे नेते अजित पवार आणि पुण्याचे महापौर दत्तात्रय बलकवडे आहेत.