अखेर सलमान सुटला

अखेर सलमान सुटला

हिट अँड रन प्रकरणातून अभिनेता सलमान खानची अखेर सुटका झाली आहे. सरकारी पक्षाकडे त्याला दोषी ठरवण्यासाठी सक्षम पुरावे नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे सलमानची सर्व दोषातून मुक्तता झाली.

तब्बल १३ वर्षानंतर सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल लागला. सलमान दारू पिऊन गाडी चालवत होता, हे सिद्ध करणारे भक्कम पुरावे नसल्याने सलमानची सुटका झाली.

बुधवारी उच्च न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणाची निरीक्षणे नोंदवली. त्यावेळी कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.  मात्र त्यांच्या साक्षीच्या परिणांमाबाबत चर्चा होऊ शकते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *