ठाण्यात अँब्युलन्समध्ये स्फोट, एका दिवसाची चिमुकली मृत्यूमुखी

ठाणे येथिल वर्तक नगरमधील वेदांता हॉस्पिटलच्या संकुलामध्ये दोन खासगी अँब्युलन्सना स्फोटानंतर आग लागली आहे, या आगीत एका दिवसाच्या मुलीचा भाजून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचं प्रथमिक सुत्राकडून समजते आहे. एम एच ०४ ई एल ९२१६ आणि एम एच ४३ ५३१८ या क्रमांकाच्या अँब्युलन्सला आग लागली. ठाणे मनपाच्या अग्निशामक दलाच्या बंबाने ही आग विजवली आहे.
हा स्फोट इतका भीषण होता, की रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. इतकंच नाही तर स्फोटाच्या आवाजाने बाजूच्या इमारतीच्या काचांना तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे.
या भीषण आगीत डॉ. भवनदीप गर्ग (३०) २१ टक्के भाजले आहेत तर नर्स लीजा सी चाको (२८) ७ टक्के भाजली आहे. दोघांनाही ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत धीरज जैन (३०) किरकोळ जखमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *