‘‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) वतीने चालू आर्थिक वर्ष 2015-16 साठीच्या पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे, असे केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले.
ईपीएफओसाठी जानेवारीमध्ये बैठक होणार आहे. त्यात 2015-16 वर्षासाठीचे व्याजदर निश्चित करण्यात येणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पीएफवर 8.75 टक्के व्याजदर मिळते आहे. चालू आर्थिक वर्षात यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.